
श्री उद्यान गणेश मंदिराच्या 55 किलो वजनापर्यंतच्या 17 वर्षांखालील शालेय कबड्डी स्पर्धेत श्री गणेश विद्यालय, टिळकनगर मनपा हिंदी शाळा, साने गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूल, ताराबाई मोडक हायस्कूल, डी. एस. हायस्कूल संघांनी सलामीचे सामने जिंकले. श्री गणेश विद्यालयाने सनराईज इंग्लिश स्कूलचा 45-37 असा पराभव करताना आर्यन म्हस्के चढाईत चमकला.
दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील मंदिर परिसर मैदानात टिळकनगर मनपा हिंदी शाळेने डॉ. डी. बी. कुळकर्णी विद्यालयावर 56-16 असा मोठा विजय मिळविला. विजयी संघाच्या यशात योगेश पटेलच्या चढाया व आमीर शेखच्या पकडी मौलिक ठरल्या. अन्य सामन्यांत डी. एस. हायस्कूलने शिशु विहार माध्यमिक विद्यालयाला 39-22 असे, छत्रपती शिवाजी विद्यालयाने आयईएस मॉर्डन इंग्लिश स्कूलला 41-33 असे नमवले.





























































