अशीही अनोखी खाद्यजत्रा; 22 प्रकारचे मासे, भाताचा आस्वाद घ्या…तोही मोफत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जत्रा हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय. आपल्या गावातील जत्रेत सहभागी होण्यासाठी अनेकजण वेळ काढून जातात. मात्र, आपला देश विविधतेने नटलेला असल्याने विविध प्रकारच्या यात्रा आणि जत्रा देशात भरत असतात. आता पश्चिम बंगालमध्ये भरलेली एक खाद्यजत्रा चर्चेचा विषय ठरली आहे. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेनमित्त होणारे विविध मेळे अनेकांना परिचीत आहेत. मात्र, ही खाद्यजत्रा चर्चेत आहे, त्याला कारणही तसेच आहे. या जत्रेत 22 प्रकारचे मासे आणि भाताचा आस्वाद घेता येणार आहे आणि विशेष म्हणजे त्यासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. या खाद्यजत्रेचा आनंद मोफत घेता येणार आहे.

पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमध्ये एक खाद्यजत्रा भरली आहे. या जत्रेला मासळी-भात मेळा असे नाव देण्यात आले आहे. बंगालमधील अनेकजण खाद्यप्रेमी आहे. मासळी आणि भात हे त्यांच्या आवडीचे खाद्य आहे. या जत्रेत तब्बल 22 प्रकारच्या मासळींसोबत भाताचा आस्वाद मोफत घेता येणार आहे. बंगालच्या जनतेला मासळीसोबत भात, डाळ, भाजी, सूप काहीही असले तरी चालते. मात्र, विविध प्रकारच्या मसाळींची चव घेण्यात त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे ही आगळीवेगळी खाद्यजत्रा भरवण्यात आली आहे.

या खाद्यजत्रेत रुई, कतला, वेटकी, पॉमफ्रेट, टंगला यासह 22 प्रकारच्या विविध मासळींचा आस्वाद घेता येणार आहे. या खाद्यजत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागणार नाहीत. येथील पदार्थांचा आस्वाद मोफत घेता येणार आहे. या खाद्यजत्रेचे आयोजन दुर्गापूर एलो सोसायटीने केले आहे.

कोरोना महामारीमुळे उद्योगजगतात आलेली नकारात्मकता आणि जनतेतील उदासीची भावना दूर करण्यासाठी या खाद्यजत्रेच आयोजन करण्यात आले आहे. या खाद्यजत्रेत विविध भागातील लेक मोठ्या संख्येने येत आहेत आणि या खाद्यजत्रेचा आनंद लूटत आहेत. तसेच कोणती मासळी भाताबसोबर अधिक रुचकर लागते, यावरही चर्चा होत आहे.