बायकोला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडले, नवऱ्याचा पारा चढला आणि…

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा मुख्यालयात असलेल्या एका गेस्ट हाऊसमोर बुधवारी दुपारी एका व्यक्तीने आपल्या पत्नीला पणियारा भागातील सरपंचासोबत नको त्या अवस्थेत पाहून गोंधळ सुरू केला. पतीने कमरेचा बेल्ट काढून पत्नी आणि तिच्या प्रियकराची भररस्त्यात चांगलीच धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भर रस्त्यात पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराची पट्ट्याने धुलाई करत असल्याने घटनास्थळी बघणाऱ्यांची एकच गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पतीने पत्नी आणि प्रियकराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

नेमके काय घडले?

महाराजगंज येथे राहणाऱ्या एका तरुणाचे त्याच्या शेजारील गावात राहणाऱ्या एका तरुणीसोबत 2017 मध्ये लग्न झाले होते. काही वर्ष सुखाचा संसार केल्यानंतर दोघांमध्ये अचानक भांडण होण्यास सुरुवात झाली. पती कामावर जाताच पत्नी दिवसभर कुठेतरी फिरण्यासाठी जात असल्याचे पतीच्या लक्षात आल्याने त्याला पत्नीवर संशय आला होता. यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. अनेकदा दोघांचे भांडण गावातील सरपंचांपर्यंत गेलं. मात्र, सरपंचांनी सांगून सुद्धा त्यांचा वाद काही मिटला नाही. त्यामुळे पतीने आपल्या पत्नीवर पाळत ठेवण्यास सुरूवात केली.

एकेदिवशी पतीने कामावर जाण्याचं नाटक केलं आणि तो घरातील गच्चीवर लपून बसला. पती कामावर गेल्याचं कळताच, पत्नी नेहमीप्रमाणे घराबाहेर पडली. रस्त्यात अचानक ती एका व्यक्तीच्या दुचाकीवर बसून निघून गेली. पतीने दोघांचाही पाठलाग सुरु केला असता, ते दोघेही एका हॉटेलात गेल्याचं पतीला दिसलं. या गोष्टीवरून पतीचा पारा चढला व त्याने आपल्या मित्रांना बोलावून हॉटेलमध्ये गोंधळ सुरु केला. मॅनेजरकडून रुमची दुसरी चावी घेतली आणि दरवाजा उघडला. तिथे पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहून पतीला धक्काच बसला. हा प्रकार बघताच पतीने पत्नीसह तिच्या प्रियकराला बेल्टने मारहाण केली.

भर रस्त्यात पतीला आपल्या पत्नीची आणि तिच्या प्रियकराची धुलाई करताना बघून परिसरात बघणाऱ्यांची मोठी गर्दी जमली होती. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पती-पत्नीची समजूत काढून हे प्रकरण मिटवलं. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.