
हिंदुस्थानी संघाचा विकेटकिपर ऋषभ पंत याचा काही महिन्यापूर्वी अपघात झाला होता. आता त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. तो घरी आला असून हळूहळू त्याच्या जखमाही भरत आहेत. मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये घरी परतत असताना त्याचा भीषण अपघात झाला. त्याची गाडी या अपघातात पूर्णपणे जळाली. या दुर्घटनेत ऋषभ पंत सुदैवाने बचावला, मात्र ात तो गंभीर जखमी झाला होता, त्यामुळे त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
एवढेच नाही तर या अपघातामुळे ऋषभ पंतला काही काळ मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. ऋषभने नुकतेच दोन महिन्यानंतर इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर करत हेल्थ अपडेट दिली होती. त्यात तो कुबड्यांच्या मदतीने हळहळू चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. प्रत्येकजण पंतसाठी प्रार्थना करत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे, नुकतेच उर्वशीला ऋषभच्या लेटेस्ट फोटोबाबत विचारण्यात आले की, तिने पंतच्या रिकव्हरीचा फोटो पाहिला आहे का?
View this post on Instagram
या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेत्री म्हणाली की, पंत हा आपल्या देशाचा अभिमान आहे. माझी प्रार्थना त्याच्या पाठीशी आहेत. पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेला चर्चेत आहे. हिंदस्थानी यष्टीरक्षक-फलंदाजाच्या अपघातानंतर, पंतला ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्या हॉस्पिटलच्या बाहेर त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला.जिथे पंतला दाखल करण्यात आले होते. यानंतर उर्वशीच्या आईनेही पंतच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती.
वास्तविक, एकेकाळी पंत आणि रौतेला यांची नावे जोडली जात होती, मात्र गेल्या वर्षी रौतेलाच्या एका मुलाखतीनंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. एकमेकांचे नाव न घेता दोघांनीही एकमेकांना खूप काही ऐकवले होते.




























































