ट्रम्प पत्रकाराला म्हणाले, तुम्ही तिकडेच थांबायला हवे होते! अमेरिका-इराण चर्चेची दुसरी फेरी ‘पुढील दोन दिवसांत’?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
us-iran-second-round-of-talks-likely-in-next-two-days-in-islamabad (1)

‘इस्लामाबाद टॉक्स’ची पहिली फेरी निष्फळ ठरली असली तरी आता एक नवीन माहिती समोर आली आहे. मंगळवारी अमेरिकेतील माध्यमांनी वृत्त प्रसिद्ध केले आहे की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेसाठी उत्सुक असून इराणसोबतच्या चर्चेची दुसरी फेरी ‘पुढील दोन दिवसांत’ पुन्हा एकदा इस्लामाबादमध्ये आयोजित केली जाऊ शकते.

‘द न्यूयॉर्क पोस्ट’शी बोलताना ट्रम्प म्हणाले, ‘तुम्ही तिथेच (पाकिस्तानात) थांबायला हवे, कारण खरोखरच पुढील दोन दिवसांत काहीतरी घडू शकते आणि आमचा कल तिथे जाण्याकडे अधिक आहे’.

चर्चेच्या दुसऱ्या फेरीची ही शक्यता निर्माण होण्याचे श्रेय ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना दिले आहे. त्यांनी असीम मुनीर यांचे कौतुक देखील केल्याचा उल्लेख आहे. असीम मुनीर यांनी ‘उत्कृष्ट कामगिरी’ केली असे ट्रम्प म्हणाले असा उल्लेख देखील पीटीआयच्या वृत्तात करण्यात आला आहे.