हिंदुस्थानी दूतावासाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी जाळला तिरंगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। न्यूयॉर्क

२६ जानेवारी रोजी हिंदुस्थानमध्ये प्रजासत्ताक दिन धूमधडाक्यात साजरा होत असतानाच अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे हिंदुस्थानी दूतावासासमोर खलिस्तानवाद्यांनी तिरंगा जाळल्याचा संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थान विरोधी नारेबाजी करत शीख समर्थकांनी तिरंगा पेटवला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. दरम्यान या कृत्यावर येथील स्थानिक शीख समुदायाने टीका केली आहे.

शनिवारी दुपारी २६ जानेवारीनिमित्त अनेक शेकडो हिंदुस्थानी नागरिक येथील दूतावासाबाहेर तिरंगा घेऊन जमा झाले होते. सगळेजण भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. त्याचवेळी अचानक १५-२० जण असलेला शीख फॉर जस्टिस (SFJ) या खलिस्तान समर्थकांचा एक घोळका या गर्दीत घुसला. पाकिस्तानी मीडियाही तेथे उपस्थित होता. त्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच खलिस्तानी समर्थकांनी ‘खलिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत तिरंगा जाळला. या प्रकारामुळे येथे काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान खलिस्तान समर्थकांनी शीख फॉर जस्टिसच्या वेबसाईटवर तिरंगा जाळल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.