भयंकर! सिरीअल किलरने दिली 90 जणांची हत्येची कबुली

32

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेत एका सिरीअल किलरने 90 जणांची हत्येची कबुली दिली आहे. सॅम्युअल लिटील असे त्याचे नाव असून त्याचे वय 78 वर्षं आहे. सॅम्युअलला तीन महिलांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने 1970 ते 2005 या कालावधीत तब्बल 90 जणांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे एफबआयने म्हटले आहे. त्याच्यावरील सर्व आरोप सिद्ध झाल्यास तो अमेरिकेतला सर्वात हिंस्र सिरीअल किलर ठरेल.

सॅम्युअलला अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाहून 2012 मधे अटक करण्यात आली होती. सॅम्युअलचा डीएनए हा 1987 आणि 1989 मधे झालेल्या तीन महिलांच्या हत्येदरम्यान मिळालेल्या डीएनशी जुळला आहे. या तीनही महिलांना अमानुष मारहाण करून त्यांचा गळा आवळून ठार केले होते व नंतर त्यांचे मृतदेह गाडले होते. या तीनही खटल्यांमध्ये त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र अमेरिकन पोलिसांना एफबीआयच्या मदतीने व सॅम्युअलच्या डीएनएद्वारे आणखी हत्यांचा तपास करायचा आहे. सॅम्युअलने 50 वर्षांमध्ये अमेरिकेतल्या 12 राज्यात 90 जणाच्या हत्या केल्या आहेत. सॅम्युअलने केलेल्या हत्या त्याला आजही आठवतात. त्यातील 34 जणांच्या चेहऱ्यांचे वर्णन देखील तो सांगतो.

आपली प्रतिक्रिया द्या