
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश किधानसभा निकडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 60.31 टक्के मतदान झाले आहे. गुरुवारी राज्यातील 11 जिह्यांत 58 जागांकर मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामुळे या मतदारसंघांत निवडणूक रिंगणात उतरलेल्या 643 उमेदवारांचे भवितव्य ईक्हीएममध्ये बंद झाले आहे.
11 जिल्ह्यांचा विचार करता शामलीमध्ये सर्वाधिक 69.42 टक्के मतदान झाले, तर गाझियाबादमध्ये सर्वात कमी 52.43 टक्के मतदानाची नोंद झाली. तसेच आग्रा-60.23, अलिगढ-61.37, बागपत-62.46, बुलंदशहर-63.35, गौतमबुद्धनगर-57.04, गाझियाबाद-52.43, हापूड-60.53, मथुरा-62.90, मेरठ – 60.58, मुझफ्फरनगर-65.30 टक्के असे मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानाकर बहिष्कार टाकण्यात आला, तर 50हून अधिक केंद्रांवर ईव्हीएम बिघाडामुळे मतदानात व्यत्यय आला. तसेच काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीही झाली.
आरएलडी नेते चौधरींनी मतदान केलेच नाही!
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखालील आघाडीला विजय मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस प्रचारात गुंतलेले राष्ट्रीय लोकदलाचे (आरएलडी) अध्यक्ष जयंत चौधरी यांनी गुरुवारी स्वत:चे मत वाया घालवले. ते सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत बिजनौरला प्रचारात गुंतले होते. तेथील जनतेला त्यांनी न विसरता मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र स्वत: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते मथुरेतील मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकले नाहीत.
























































