मुली जन्माला घातल्या म्हणून महिलेला सासरच्यांची बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनेला फक्त मुलीच होतात म्हणून तिच्या सासऱच्यांनी तिला बेदम मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील महोबा जिल्हयातील साकूर गावात घडली आहे. या महिलेला दोन मुली असून तिच्या नवऱ्याला व सासरच्यांना मुलग्याची अपेक्षा होती.

सदर महिलेला दोन मुली असल्याने तिचे सासरचे तिच्यावर बरेच महिने झाले अत्याचार करत होते. सदर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेवरील अत्याचाराला वाचा फुटली. ”माझा नवरा व सासू सासरे कायम मला मारझोड करायचे. अनेकदा त्यांनी मला उपाशी देखील ठेवले आहे. दुसऱी देखील मुलगी झाल्यावर माझ्यावरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत” असे त्या महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत सदर महिलेला दोन महिला निर्दयीपणे मारहाण करत असून ती महिला दयेची भीक मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तक्ररा दाखल केली असून महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.