नोकरभरतीला सामोरे जाणाऱया उमेदवारांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उमेदवारांना नोकरभरतीबरोबरच स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासाने सामोर जाता यावे म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, सरचिटणीस, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महासंघाच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जात आहे.

त्यानुसार पहिल्या टप्प्यातील वर्गाला उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता उमेदवारांच्या विनंतीवरून प्रशिक्षण वर्गाची दुसरी बॅच घेण्यात येणार आहे. त्यानुसार प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेऊ इच्छिणाऱया उमेदवारांनी महासंघाकडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

कोरोना महामारीच्या निर्बधांमुळे प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्ग घेण्यावर मर्यादा येत आहेत. त्याची दखल घेत भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये ऑफिस अटेंडंट या पदासाठी होणाऱया भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांची प्राधान्याने भरती व्हावी, स्पर्धा परीक्षेला मराठी तरुण-तरुणींना यशस्वीपणे सामोरे जाता यावे म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.

त्यानुसार 15 मार्चपासून सुरू झालेल्या पहिल्या टप्प्यातील वर्गाला उमेदवारांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ज्या उमेदवारांना सदर वर्गाचा लाभ घेता आला नाही त्यांच्याकडून प्रशिक्षण वर्गाची दुसरी बॅच घेण्याची विनंती केली आहे. त्याची दखल घेत महासंघाने दुसरी बॅच घेण्याचा निर्णय घेतला असून याचा लाभ घेऊ इच्छिणाऱया उमेदवारांनी प्रवेशासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ कार्यालय, शिवसेना भवन येथे रविवार व सुट्टीचा दिवस वगळून सायंकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत चिटणीस शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (9867634856) यांच्याशी संपर्प साधावा, असे महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी कळवले आहे.