
देशात कोरोना प्रतिबंधक लसींचा अल्पावधीत ठणठणाट झाला असतानाही ‘लस उत्सवा’चा ढोल बडवणारे मोदी सरकार पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. लस उत्सवाच्या चार दिवसांत लसीकरणाचा टक्का वाढला नाहीच, उलट लसीकरणाची आधीची सरासरी 12 टक्क्यांनी घसरली.
लसींच्या तुटवडय़ाबाबत महाराष्ट्रासह विविध राज्यांनी आपले म्हणणे मांडले होते. त्यावर सढळहस्ते मदत करण्याऐवजी केंद्राने आपल्या अपयशाचे खापर राज्यांवर फोडले होते. देशात कुठेही लसींचा तुटवडा नसल्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले होते.
आकडेवारीचा घोळ
केंद्राने ‘लस उत्सवा’त 1 कोटी 28 लाख डोस दिल्याचा दावा गुरुवारी केला. प्रत्यक्षात अवघे 99.64 लाख डोस दिल्याचे ‘कोविड19इंडिया.ओआरजी’ या संकेतस्थळाच्या आकडेवारीतून उघड झाले आहे. याशिवाय आरोग्य मंत्रालयाने रोज सायंकाळी जाहीर केलेली आकडेवारी वेगळीच होती.


























































