आंब्यावर रोग पडलाय, शेतकऱ्यांना अनुदान द्या – वैभव नाईक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आज विधानसभेत पुरवणी प्रश्नावर बोलताना कोकणातील आंबा पिकावर पडलेला रोग, भातावरील बोनस, मत्स्य विभागाला गस्ती नौका, रखडलेला वाळू लिलाव या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कोकणात आंबा हे प्रमुख पीक असून त्यातून राज्याला मोठय़ा प्रमाणात परकीय चलन मिळते. सध्या आंबा पिकावर थ्रीप्स हा रोग पडला आहे. मालवण व देवगड तालुक्यांतील शेतकऱयांनी तक्रारी केल्यानंतर कृषी विभागाने फवारणी करूनही रोग गेलेला नाही. कृषी विभागाने सुचवलेली औषधेही बोगस निघाली आहेत. त्यामुळे सरकारने आंबा उत्पादक शेतकऱयांना अनुदान जाहीर करावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली.