वंदे भारत ट्रेन बोरिवलीत थांबणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vande-bharat-express

मुंबई सेंट्रल-अहमदाबाद दरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन आता बोरिवली स्थानकात थांबणार आहे. तसेच बुधवार वगळता दररोज ही गाडी धावणार आहे. वंदे भारत या गाडीला मुंबई सेंट्रलहून सुटल्यानंतर किंवा अहमदाबादहून येताना महाराष्ट्रात एकही थांबा नव्हता. त्यामुळे प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी किंवा उरण्यासाठी मुंबई सेंट्रलला जावे लागते. परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय होते. याची दखल घेत यापुढे वंदे भारत ट्रेनला बोरिवली येथे थांबा देण्यात येणार असल्याची माहिती त्याबाबतची माहिती रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी ट्विट करत दिली आहे.