
राज्य मराठी विकास संस्था आणि पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा ः वासंतिक उत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. 20 मे ते 3 जून या कालावधीत उत्सव साजरा होत आहे. ‘भाषा भरजरी, तिचा उत्सव जरतारी’ असे स्वरूप असलेल्या कार्यक्रमात रसिकांना दररोज वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मिळत आहे.
20 मे रोजी ‘कवितेचं बेट’ या कवितांच्या बहारदार कार्यक्रमाने आणि ‘मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास’ या नाटय़ सादरीकरणाने वासंतिक उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर शांता शेळके यांच्या भावस्पर्शी कवितांवर कार्यक्रम ‘अनवट शांताबाई’ तसेच ‘इये मराठीचिये संगमावरी’, खान्देशी बोली भाषांतील एकल नाटय़प्रयोग ‘नली-निरपेक्ष प्रेमाची गोष्ट’, अवयवदानावर जनजागृती करणारी एकांकिका ‘स्टार’, ‘एच. एम. व्ही- हिज मास्टर्स व्हॉईस’, ‘बाई समजून घेताना’, ‘अक्षरनामा’, साहित्यिक व नेत्यांच्या पत्रांचे अभिवाचन ‘टपाल’ असे विविध कार्यक्रम सादर झाले. त्यांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. 30 मे रोजी ‘मराठी माझी देवालाही आवडे’ हा कार्यक्रम सादर झाला. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कलांगणात सर्व कार्यक्रम आहेत.
– 31 मे रोजी 6.30 वाजता ‘खडीगंमत’ कार्यक्रम सादर होईल.
– 1 जून रोजी ‘नादप्रहर’ कार्यक्रम होणार आहे. कवी जी. ए. कुलकर्णी, आरती प्रभू, रॉय किणीकर, ग्रेस यांच्या कवितांचे चालबद्ध सादरीकरण आहे. संकल्पना व संहिता दीपक करंजीकर यांची तर संगीत कौशल इनामदार यांचे आहे.
– 2 जून रोजी 6.30 वाजता ‘जीर्णोद्धार’ ही सातारी बोलीभाषेतील एकांकिका सादर होईल. रात्री 8 वाजता ‘स्त्र्ााr, जातं, ओवी आणि कविता’ हा कवी किरण येले यांच्या स्त्र्ााrविषयक कवितांवर आधारित कार्यक्रम होईल.
– 3 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘रंग नवा’ कार्यक्रम सादर होईल. संकलन, संगीत व संहिता मिलिंद जोशी यांची आहे.





























































