हडपसरमध्ये सराईत वाहन चोरांना अटक; 7 दुचाकी जप्त, युनिट पाचची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या दोघा सराईतांना युनिट पाचने अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ गुन्ह्यांची उकल करून पाच लाखांवर किंमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ऋषीकेश संतोष मोटे (वय 20, रा. फुरसुंगी ) आणि रिहान सलीम शेख (वय 21, रा. रेल्वेगेट फुरसुंगी ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

वाहन चोरीच्या पार्श्वभूमीवर युनिट पाचचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सराईत वाहनचोर ससाणेनगर परिसरात असल्याची माहिती अकबर शेख आणि विनोद शिवले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आठ दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, एपीआय कृष्णा बाबर, विनोद शिवले, अकबर शेख, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे, दया शेगर, चेतन चव्हाण, अश्रुबा मोराळे, दत्तात्रय ठोंबरे, अमर उगले, पांडुरंग कांबळे, पृथ्वीराज पांडुळे, विलास खंदारे, दाउद सय्यद, दीपक लांडगे, संजयकुमार दळवी, स्वाती गावडे, तृप्ती झगडे यांनी केली.

आरोपींनी हडपसर, लोणी काळभोर आणि रांजणगाव परिसरातून दुचाकींची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून पाच लाखांवर किंमतीच्या एकूण सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
– हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक, युनीट पाच