वेण्णा तलाव ओव्हरफ्लो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहर व परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, आजही जोरदार वाऱयासह पावसाची धुवाँधार ‘बॅटिंग’ सुरूच आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर, पांचगणीकरांची तहान भागविणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला असून, शनिवारी पहाटे वेण्णा लेक सांडव्यावरून पाणी वाहू लागले. महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर बगिचा कॉर्नरनजीक पाणी आल्याने वाहतूक काही काळ मंदावली होती.