विद्या मंदिर दहिसरला कबड्डीत उपविजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनव शेतकरी मंडळ आयोजित कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर या तीनही जिल्ह्यात विद्या मंदिर दहिसरने अंतिम लढत निर्विवाद गाजवली आणि उपविजेतेपद पटकावले. कर्णधार अनिता शाक्री, उपकर्णधार चंचल राठोड, अनुजा जाधव, राधिका जाधव यांच्या अष्टपैलू खेळाने या लढतीत मोलाची भर घातली. श्रेया गवळी, रिया भुवड, नेहा हरवंदे, अंजली कदम, साक्षी जाधव, कल्पना गोरे यांनीही आपला खेळ दाखवत उत्कृष्ट साथ दिली.

या संघाला विप्रमं विद्या मंदिरचे क्रीडा प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच विठ्ठल सुळे यांचे प्रशिक्षण लाभले. या सर्व यशस्वितांना विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सुधीर देसाई यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.