
अष्टपैलू अभिनेते, संवेदनशील समाजव्रती विक्रम गोखले यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रविवार, 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता, विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या सावरकर पटांगणावर ‘आठवणीतले विक्रमकाका’ या शीर्षकांतर्गत श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विक्रम गोखले मित्र परिवार, पार्ले महोत्सव परिवार, लोकमान्य सेवा संघ व जागतिक मराठी नाटय़धर्मी निर्माता संघ यांच्यावतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला भरत दाभोळकर, किरण कुमार, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी, सचिन खेडेकर, विजय केंकरे, जितेंद्र जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने आमदार पराग अळवणी यांनी केले आहे.



























































