विक्रांत सरंजामे ईशाला घालणार लग्नाची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

छोट्या  पडद्यावर सध्या ’तुला पाहते रे’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. विक्रांत आणि ईशा या दोघांनीही एकमेकांच्या मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दोघांच्या आर्थिक परिस्थिती, राहणीमान आणि वयामध्ये फरक आहे आणि म्हणूनच काही लोकांना त्या दोघांनी एकत्र येणं मान्य नाहीये. त्यांच्या प्रेमाचा प्रवास खडतर असेल की सोपा हे तर वेळच ठरवेल, पण तूर्तास विक्रांत सरंजामे ईशाला लग्नाची मागणी घालण्याचा सराव करताना दिसत आहे. विक्रांतची मागणी घालण्याची पद्धत देखील तितकीच हटके आणि रोमांचक असणार आहे. विक्रांत आणि ईशा यांच्या आयुष्यातील हा महत्वाचा क्षण अनुभवायला पाहायला वासरू नका ’तुला पाहते रे’ मालिकेचा 1 तासाचा विशेष भाग 9 डिसेंबर संध्याकाळी 8 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.