सहजीवनी या… एकमेकांची सोबत

>> विलास पाटील

आपला जोडीदार : संगीता पाटील

लग्नाचा वाढदिवस : 6 जानेवारी 1997

आठवणीतला क्षण : पहिली मुलगी झाली तो क्षण आयुष्यात विसरू शकणार नाही. तिचं नाव वैष्णवी. मुलगी झाली तेव्हा पहिल्यांदाच आईबाबा झालो म्हणून आम्हा दोघांनाही खूप आनंद झाला होता. त्यानंतर आमचा दुसरा मुलगा झाला. विनायक. तो क्षणही आठवणीतला आहे.  

त्यांचे दोन शब्दात कौतुक : ती समजून घेणारी आहे. काळजी घेते सर्वांची, नेहमी आनंदी असते. माझ्या कोणत्याही सुखदुःखात ती साथ देते.  

त्यांचा आवडता पदार्थ : आईस्क्रीम  

वैतागतात तेव्हा : सहसा माझ्यावर वैतागत नाही, पण काही कारणाने वैतागली तरी मी तिला मनवतो. ते मला चांगलं जमतं.  

त्यांच्यातली कला : स्वयंपाक ती छान करत असल्याने तिची कला उत्तम स्वयंपाक हीच आहे.  

त्यांची गंमत करायची असल्यास : मी साधारण गंभीर प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे मला तिची गंमत करायला कधी जमतच नाही. ती बरेचदा माझी गंमत करते. मला तेही खूप आवडतं.  

स्वभावाचे वैशिष्ट्य  : सर्वांना आपलंसं करते. कधी कचाकचा भांडलेली मी पाहिली नाही. सर्वांशी मिळूनमिसळून वागते. म्हणूनच सर्वांना ती आपलंसं करू शकते. तिचा स्वभावच आहे तो.  

त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ : भोली सी सूरत आखों में मस्ती  

तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान : संगीता माझा श्वास आहे. तिच्याशिवाय मी जगूच शकणार नाही. म्हणूनच ती श्वासासारखी आहे. ती आहे म्हणून सगळं सुरळीत आहे.  

भूतकाळात जगायचे असल्यास : वैष्णवीचा जन्म झाला तेव्हा मी जसा आनंदी होतो, तो दिवस… ते क्षण पुन्हा जगावेसे वाटतात.

आपला जोडीदार… त्याची अनेक वर्षांची मोलाची साथ. अनेक गोड, तिखट आठवणींना उजाळा देणारं… आणि पती-पत्नी या नात्यातील भावबंध दृढ करणारं सदर… आपणही आपल्या जोडीदाराविषयीच्या नाजूक भावना मांडा छायाचित्रासहित या सदरामध्ये… या प्रश्नांच्या चौकटीत… सुंदर, तरल भावनांना प्रसिद्धी दिली जाईल.

आमचा पत्ता : आनंदाचं झाड, शेवटचे पान, दै. ‘सामना’, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा backspage18@gmail.com वरही पाठवता येईल.