#MeToo: 20 वर्षांनी होणार विनता नंदा यांची वैद्यकीय तपासणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या लेखिका-निर्माती विनता नंदा यांना पोलिसांनी तब्बल 20 वर्षांनी वैद्यकीय तपासणीसाठी बोलवलं आहे. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविरोधात सुरू झालेल्या #MeToo या मोहिमेअंतर्गत 8 ऑक्टोबर रोजी नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर आरोप केले होते.

8 ऑक्टोबर रोजी एका सोशल मीडिया पोस्टमधून नंदा यांनी लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप केले होते. त्यानंतर नंदा यांनी पोलिसात तक्रारही केली होती. सुमारे तीन आठवड्यानंतर पोलिसांनी आता एफआयआर दाखल करून घेण्यासाठी व वैद्यकीय तपासणीसाठी आपल्याला बोलवलं असल्याचं नंदा यांचं म्हणणं आहे.

आलोकनाथ हे आपल्या मैत्रिणीचे पती असूनही त्यांनी दारूच्या नशेत आपल्यावर एकाहून अधिक वेळा बलात्कार केल्याचा आरोप नंदा यांनी केला होता. 1994मध्ये तारा या प्रसिद्ध मालिकेचं लेखन करण्याची जबाबदारी नंदा यांच्यावर होती. त्यावेळी आलोकनाथ सेटवर दारू पिऊन येत असत. एक दिवस त्यांच्या घरी असलेल्या पार्टीनंतर मध्यरात्री घरी सोडण्याच्या बहाण्याने आलोकनाथ यांनी आपल्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप नंदा यांनी केला होता.

summary- vinta nanda will undergo medical test after 20 years