मासे पकड़ायला गेला आणि माश्यांनीच त्याला पाण्यात खेचले

साधारणत: मासा गळाला लागला की मच्छिमार त्याला वर ओढून घेतो असे आपण पाहिले असेल. मात्र सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात चक्क माशानेच मच्छीमाराला पाण्यात ओढून घेतल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला  असून नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

The Average Anglers या नावाने इस्टाग्रामवर असलेल्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओची सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. व्हिडीओत एक व्यक्ती नदीच्या किनाऱ्यावर मासे पकडायला उभा असतो. आपण सहज मासे पकडून असा आत्मविश्वास त्याच्या वागण्यावरून दिसत आहे. मात्र काही सेकंदातच नदीतले मासे त्याच्या या अतिआत्मविश्वासाचा फडशा पाडतात. त्या मच्छिमाराने मासे पकडण्यासाठी त्याने पाण्यात गळ टाकला खरा मात्र माश्यांनी या गळासकट त्या माणसालाही पाण्यात खेचला. पाण्यात खेचल्यावर या माश्यांनी त्याच्यावर उड्या घेत त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान तिथे असलेल्या एका उपस्थिताने हा व्हिडीओ बनवला असून व्हिडीओला अनेक लोकांचे बरेच लाइक्स मिळाले आहेत.

पाहा व्हिडीओ –

>

आपली प्रतिक्रिया द्या