कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषक स्पर्धा – विरार केंद्राला विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित आणि एलआयसी पुरस्कृत 30 व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषकात विरार केंद्राने वांद्रे केंद्राला पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर अंतिम लढतीत सहज विजय मिळवत यंदाचे जेतेपद पटकावले.

विरार केंद्राने प्रथम फलंदाजी करताना सर्व बाद 167 धावा केल्या होत्या. त्यानंतर विरारच्या  कार्तिकेय  शुक्ला (20 धावांत 6 विकेट) याच्या अफलातून  फिरकी गोलंदाजीपुढे वांद्रे केंद्राचा पहिला डाव 67 धावांत गडगडला आणि पहिल्या डावातील आघाडीवर सहज विजय मिळवत  विरार केंद्राने तिसाव्या कल्पेश गोविंद कोळी चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी कसोटीपटू सलील अंकोला, एलआयसीच्या मार्केटिंग मॅनेजर ऋता अजगावकर आणि डॉ. शैलेश श्रीखंडे यांच्यासह अन्य  मान्यवर उपस्थित होते. पारितोषिक वितरण सोहळय़ाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध युवा समालोचक प्रसन्न संत यांनी केले.