
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा (NASA)च्या शास्त्रज्ञांनी मंगळ ग्रहावर पाण्याचा स्त्रोत असल्याचे म्हटले आहे. वैज्ञानिकांनी मंगळच्या जमीनीखाली तीन सरोवर असल्याचा दावा केला आहे.
दोन वर्षांआधी देखील मंगळ ग्रहाच्या दक्षिण ध्रुवावर एक मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असल्याचे बोलले जात होते. हे सरोवर बर्फा खाली दाबले गेले असल्याचे सांगितले जात होते. म्हणजेच भविष्यात मंगळ ग्रहावर मानवी वस्ती वसवायचे झाल्यास तिथे पाण्याचा उपयोग करता येऊ शकतो.
यूरोपियन अंतराळ संस्था (ESA)चे अंतराळ यान ‘मार्स एक्सप्रेस’ने 2018 मध्ये या जागेवर बर्फाखाली खाऱ्या पाण्याचे सरोवर असल्याचे म्हटले आहे. या सरोवरासंदर्भात निश्चित माहिती घेण्यासाठी 2012 ते 2015 पर्यंत मार्स एक्सप्रेस सॅटेलाइट 29 वेळा त्या भागातून गेले आणि त्या विभागाची छायाचित्रे घेण्यात आली. या भागात आणखी तीन सरोवरे असल्याचे छायाचित्रातून दिसत आहे. या तीन सरोवरांसाठी स्पेसक्राफ्टने हे 2012 ते 2019 दरम्यान 134 वेळा निरीक्षण केले.
मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी द्रव अवस्थेत दिसून येते. वैज्ञानिक मासिक ‘नेचर अॅस्ट्रोनॉमी’मध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. 2018 मध्ये शोधण्यात आलेला सरोवर मंगळ ग्रहाच्या दक्षिण ध्रुवावर आहे. हे सरोवर बर्फाने झाकले गेलेले आहे. हे जवळपास 20 किलोमीटर लांबीचे आहे. मंगळ ग्रहावर आढळलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा जलस्त्रोत आहे.



























































