
सामना प्रतिनिधी, राणी सावरगाव
श्री रेणुकादेवी मंदिराकडे समुद्र विहिरीजवळ जाणाऱ्या रस्त्यावर पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जलवाहिनीचे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबीकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. नागरिकांना त्यांचे हक्काचे पाणी मिळवून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी ग्रामपंचायतचा कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्र शासनाने भारतनिर्माण पाणीपुरवठा योजनेद्वारे राणी सावरगाव ग्रामपंचायतला सव्वाशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. पण शासनाने दिलेला कोटी रुपयांचा निधी आज पाण्यात गेला आहे. कारण भारतनिर्माण पाणीपुरवठा योजनेची कामे बोगस झाली आहेत. प्रत्येक वार्डातील ग्रामपंचायत नळांना पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत नाही.
ग्रामपंचायत नळाच्या पाईपलाईन फुटल्याने दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. गावात समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सदस्य यांना वेळ मिळत नाही. ग्रामविकास अधिकारी मात्र.आठदिवशातुन.दोन दा ग्रामपंचायत कारभाराचा आढावा घेऊन निघून जातो. पण नागरिकांना गावात कोणत्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी वेळ मिळत नाही. श्री रेणुका देवी मंदिराकडे समुद्र विहिरीजवळून जाणाऱ्या रस्त्यावर खालून ग्रामपंचायतची भारतनिर्माण पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन २ महिन्यापासून फुटली असून दरदिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गावातील ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करून नागरिकांना त्यांचे हक्काचे पाणी मिळवून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.




























































