आज दादर, लालबाग परिसरात पाणी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर (पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखानासमोर १२०० मिमी व्यासाची (न्यू तानसा) जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम जलकामे विभागाद्वारे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे शुक्रवार, ८ जुलैला एफ/उत्तर आणि एफ-दक्षिण विभागातील काही ठिकाणी पहाटे ४ ते सकाळी १० या वेळेत पाणीपुरवठा होणार नाही.

१) एफ / उत्तर विभाग
दादर पूर्व, माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी,

२) एफ/दक्षिण विभाग
दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी, शिवडी.