मोदींच्या जीवनावर आधारित वेबसीरीज, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मोदींच्या जीवनावर चित्रपटाची घोषणा झाली असताना त्यांच्याच जीवनावर आधारित वेबसीरीज प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. इरॉस नावने या वेबसीरीजची निर्मिती केली असून 10 भागांत मोदींचा चरित्रपट दाखवण्यात येणार आहे.

उमेश शुक्ला यांनी या वेबसीरीजचे दिग्दर्शन केले आहे. शुक्ला आणि आशिष वाघ यांनी य बेवसीरीजची निर्मिती केली आहे. तर मिहीर भुटा आणि राधिका आनंद यांनी या सीरीजची पटकथा लिहिली आहे. फ़ैसल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकूर हे तीन अभिनेते मोदींच्या भुमिकेत दिसणार आहे.

10 भागातल्या वेबसीरीजमध्ये मोदींचे बालपण, त्यांचा राजकीय प्रवेश, मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द व पंतप्रधानपदा पर्यंतचा राजकीय प्रवास या वेबसीरीजमध्ये दाखवण्यात येणार आहे. एप्रिलमध्ये निवडणूकीच्या तोंडावर ही वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे.