एकदम झकास! Whatsapp ग्रुपमधील मेसेज आता आपोआप होणार डिलीट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेसेजिंग ऍप व्हॉट्सऍप युजरसाठी नवनवीन फिचर अपडेट करत असते. आता व्हॉट्सऍपचे नवीन अपडेट आले असून या अपडेटची युजर आतुरतेने वाट पाहत होते. या फीचरमुळे व्हॉट्सऍप ग्रुपवरील मेसेज आपोआप डिलीट होणार आहेत.

अर्थातच ग्रुपमधील मेसेज आपोआप डिलीट करण्याचे ऑप्शन केवळ ऍडमिन वापरू शकणार आहे. मात्र ऍडमिन ग्रुपमधील सदस्याला हे अधिकार देऊ शकणार आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींनाही ऍडमिनच्या मदतीने हे अधिकार मिळतील.

सध्यातरी हे फीचर ऍण्ड्रॉईड मोबाईल युजर्सना मिळणार आहे. व्हॉट्सऍपच्या 2.21.8.7 या नवीन अपडेटमध्ये हे फीचर उपलब्ध आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या फीचरमुळे ग्रुपमधील मेसेज सात दिवसांनंतर आपोआप डिलीट होतील. काही दिवसांनी ग्रुपच्या मेसेजला 24 तासांत गायब होणारे अपडेट येणार आहे.