
सामना ऑनलाईन । मुंबई
आज जागतिक पितृदिन. जगाच्या भाषेत फादर्स डे. आपल्याला आपल्या बाबांविषयी काय वाटतं, ते सांगताना शब्दही अपुरे पडतील. आईइतकंच बाबांनाही आपल्या आयुष्यात महत्त्व आहे, हे सांगणारा हा दिवस कधीपासून सुरू झाला, ते माहीत आहे का?
वॉशिंग्टनमधील स्पोकेन शहरातल्या तरुणीने १९ जून १९१० रोजी फादर्स डे साजरा केला होता. आईच्या मृत्यूनंतर बाबांनी तिचं पालनपोषण केलं होत. तसंच या तरुणीला जसं मदर्स डे साजरा केला जात होता त्याचप्रमाणे फादर्स डे असावा असं वाटत होतं. त्यामुळं १९१६ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर १९२४ रोजी राष्ट्रपती कॅल्विन कुलिज यांनी या प्रस्तावाला राष्ट्रीय स्तरावर साजरा करावा, असं जाहीर केल. तसचं १९०६ मध्ये लिंडन जॉनसन या राष्ट्राध्यक्षांनी फादर्स डे प्रत्येक जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जाईल असं घोषित केलं. १९७२ रोजी नव्याने आलेले राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी फादर्स डे नियमितपणे जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जाईल असं जाहीर केल.
फादर्स डे हा आपल्या वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळं फादर्स डेच्या दिवशी बाबांना छानसं गिफ्ट देऊन त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू पाहण्यासारखं असतं. कालानुरूप या दिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बदल होत गेले आहेत. आता फादर्स डेसाठी सध्याची तरूणाई जरा हटके स्वरुपातच भेट देताना दिसून येतात. कोणी आपल्या कूल डॅडींकरता सरप्राईज पार्टीचा बेत देतात तर इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स किंवा विटेंज कलेक्शन असलेल्या भेटवस्तू देऊन त्यांना खूष करण्याचा प्रयत्न करताना काहीजण दिसतात.




























































