
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीची लाट आली असून शेवटच्या आठवडय़ात अक्षरशŠ हुडहुडी भरवणारी थंडी पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह उपनगरात सकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण दिसत असून रात्री आणि पहाटे थंडी पडत असल्याचे चित्र आहे. आज चंद्रपूर, गोंदीया येथे किमान तापमान 9 अंशांपर्यंत घसरले. महाबळेश्वरपेक्षा कमी तापमानाची नोंद याठिकाणी झाली. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात गरम कपडे घालून नागरिक बाहेर पडत असल्याचे चित्र सकाळच्या सुमारास दिसत आहे.
हळुहळू पारा घसरत आहे. विदर्भातील सर्वज जिह्यांमध्ये किमान तापमान 12 अंशाखाली गेल्याचे चित्र आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशिममध्ये थंडीची लाट असून ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटल्याचे दिसत आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पारा चांगलाच घसरला आहे.
नाताळनंतर पारा आणखी घसरणार
नाताळनंतर पारा आणखी घसरेल आणि मुंबई, ठाण्यासह उपनगरातही थंडीचा अनुभव घेता येईल असे हवामान विभागाचे वैज्ञानिक डॉ.अनुपम कश्यपी यांनी सांगितले. 25 डिसेंबरनंतर वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि उत्तेरकडून वाहणाऱया वाऱयांमुळे पारा घसरेल असे त्यांनी सांगितले.
हवामान विभागाचा अंदाज
तापमान
अंश सेल्सियसमध्ये
अकोला 12
अमरावती 10
चंद्रपूर 9
बुलढाणा 10
गडचिरोली 10
गोंदिया 9
महाबळेश्वर 12
जळगाव 13
परभणी 13
मुंबई 20




























































