
लग्नात हुंडा न दिल्यामुळे सासू-सासर्यांसह नवर्याकडून महिलेचा छळ करण्यात आला. तिच्याकडे सतत पैशांची मागणी करीत मानसित्र त्रास दिला. त्यामुळे छळास कंटाळून महिलेने गळफास घेउन आत्महत्या केली. ही घटना 10 फेब्रुवारीला फुरसुंगीतील मातोश्री निवासमध्ये घडली.
याप्रकरणी आनंद बधे (पती ), रंजना बधे, कल्याण बधे (सर्व रा. संकेत विहार फुरसुंगी )अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हर्षदा बधे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वर्षा शिवरकर (वय 22 रा. वाघोली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद आणि हर्षदा यांचे मे 2022 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर आनंदसह सासू रंजना आणि सासरे कल्याण याने हर्षदाचा छळ करण्यास सुरूवात केली. लग्नात हुंडा दिला नाही, घरातून पैसे आण, असे म्हणत तिच्याकडे सतत पैशांची मागणी केली. पतीसह सासू-सासर्यांकडून सततच्या छळाला कंटाळून हर्षदाने गळफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्येस जबाबदार असल्याप्रकरणी संबंधितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक टी. एन. खळदे तपास करीत आहेत.





























































