वृद्धिमान साहा डिसेंबरमध्ये पुनरागमनाच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
wriddhiman-saha-cricket

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

खांद्याच्या दुखापतीमुळे काही काळापासून ‘टीम इंडिया’तून दूर असलेला यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहा येत्या डिसेंबरमध्ये रणजी क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. जुलै महिन्यात खांद्याला झालेल्या दुखापतीवर तो सध्या उपचार घेत असून आपण लवकर पुन्हा मैदानावर उतरू, असा विश्वास साहाने व्यक्त केला.

आपल्या तंदुरुस्तीबद्दल बोलताना साहा म्हणाला, माझी प्रकृती सध्या झपाटय़ाने सुधारत आहे. आधीच्या तुलनेत आता खूप बरे वाटत आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत मी पुन्हा मैदानावर उतरणार आहे. त्यादृष्टीनेच माझी तयारी सुरू आहे. नेटमध्ये सरावापुरता मी तंदुरुस्त असलो तरी प्रत्यक्ष सामना खेळण्याइतपत अद्यापि सुधारणा झालेली नाही असे साहाने सांगितले. यंदाच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत केपटाऊन येथे पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर खांद्याचे स्नायू आखडल्याने वृद्धिमान साहाला मायदेशी परतावे लागले. दरम्यान, आयपीएलमध्ये अंगठय़ाला दुखापत झाल्याने तो अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यालाही मुकला होता. त्यामुळे साहा निराश झाला होता. दरम्यान, हिंदुस्थानने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी रिषभ पंत आणि पार्थिव पटेल या दोन यष्टिरक्षकांची निवड केली आहे.