
सामना प्रतिनिधी । बीड
राज्यात टंचाई आणि दुष्काळी परिस्थितीत पशुधन आणि शेतकरी जगविण्यासाठी यशवंत सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. या वर्षी राज्यात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना आपले पशुधन जगविणे अवघड झाले आहे, अशा परिस्थितीत पशुधन जगविण्यासाठी गाळपेराच्या माध्यमातून चारानिर्मिती केली जात आहे. माजलगाव प्रकल्पातील बुडीत 1500 एकरवर राज्यातील सर्वात मोठा गाळपेरा सुरू झाला. त्यामुळे जनावरांना ताजा आणी हिरवा चारा मिळणार आहे. यशवंत सेवाभावी संस्थेने 1500 एकरवर गाळपेरा सुरू केला. या गाळपेराच्या उपक्रमाला राजेंद्र मस्के यांच्याहस्ते सुरुवात झाली.



























































