
सामना प्रतिनिधी । नगर
तालुक्यातील पाडळी व डोळेवाडी येथे वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत तालुक्यातील पाडळी येथे बोअरच्या मोटारीची वायर बसवत असताना या वायरला चिकटून 19 वर्षीय दादा पोपट पवार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसर्या घटनेत तालुक्यातील राजुरी जवळील डोळेवाडी येथील घुले वस्तीवरील वयोवृद्ध महिला गयाबाई माणीक घुले (वय 75) या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेली असताना सायंकाळी आबा सदाफुले यांच्या शेतातील विहिरीवर शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी गेल्या. विहिरीवर बादलीने पाणी शेंदत असताना पाय घसरून त्या विहिरीत पडल्या. विहिरीत थोडेच पाणी होते. त्यामुळे विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





























































