एक्सपायरी डेटनंतरही खाऊ शकता ‘हे’ पदार्थ, आरोग्याला होणार नाही धोका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक अन्नपदार्थ किती काळ खावा हे ठरलेले असते. म्हणून बाजारातून एखादा पदार्थ विकत घेताना त्याच्या पॅकेटवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. बऱ्याच जणांना असे वाटते की, पॅकेटवर लिहिलेल्या एक्सपायरी डेटनंतर लगेचच अन्नपदार्थ खराब होऊ शकतात आणि ते त्यानंतर खाणे चुकीचे आहे, मात्र काही उत्पादने एक्सपायरी डेटच्या दिवशी अन्नपदार्थ खराब होत नाही. काही वस्तू कालबाह्य तारखेनंतरही सुरक्षित राहू असतात. जाणून घेऊया, असे कोणते पदार्थ आहेत जे ते एक्सपायरी डेटनंतरही खाल्ले तरी त्यामुळे आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ शकत नाही.

अंड

अंड्याच्या कॅरेटवर किंवा पॅकेजवर कोणतीही एक्सपायरी डेट लिहिलेली नसते, मात्र अंडी खरेदी केल्यापासून तीन ते पाच आठवडे अंडी सहज वापरता येऊ शकतात. अन्न सुरक्षा आणि सेंट्रल फ्लोरिडा विद्यापीठाच्या रोसेन कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे प्राध्यापक आणि स्वच्छता तज्ज्ञ केविन मर्फी यांच्या मते, अंड्यांवर लिहिलेल्या एक्सपायरी डेटवरून अंडी किती ताजी आहेत, हे कळू शकते. अंडी फ्रिजमध्ये ठेवल्यास ती आठवडाभर वापरता येऊ शकतात. जर तुम्हाला अंडी खराब झाल्याची शंका आली तर तुम्ही तपासून पाहू शकता. जर अंड पाण्यावर तरंगलं तर ते जुनं असतं. शिवाय अंड्याच्या वासावरून ते वापरावं की नाही, हे ठरवता येतं.

दूध

पॅकेज्ड दूध त्याच्या बॅगेवर लिहिलेल्या एक्सपायरी डेटनंतर एका आठवड्यात वापरून संपवावे, मात्र या दुधात फॅटचे प्रमाण किती आहे, याची माहिती करून घ्यावी तसेच फॅट असणारे दूध एक्सपायरी तारखेनंतर सात दिवसांपर्यंत वापरू शकता. दुधाची पावडर कालबाह्य तारखेनंतर 1 महिन्यापर्यंत वापरता येते. हे दूध खराब झाले तर घट्ट होऊन आंबट वास येऊ लागतो.

ब्रेड

पॅकिंग ब्रेड कालबाह्य तारखेनंतर पाच ते सात दिवस वापरता येऊ शकतो. सामान्य तापमान, थंड आणि कोरड्या जागी ठेवलेले ब्रेडचे पाकिट पाच ते सात टिकू शकते. कालबाह्य तारखेनंतर ब्रेड वापरायचा असल्यास फ्रीजमध्ये ठेवावा. हा ब्रेड कमीतकमी 3 महिने खाण्याकरिता वापरू शकता, मात्र त्याला बुरशी आलीय का हे वारंवार तपासावे. जर ब्रेडवर निळ्या-हिरव्या रंगाची बुरशी आली तर तो टाकून द्यावा.

पास्ता

सुका पास्ताच्या पाकिटवरील कालबाह्य तारीख दोन वर्षांपर्यंत असते. सुपरमार्केटच्या फ्रिजमध्ये ठेवलेला कच्चा पास्ता त्याच्या कालबाह्य तारखेपासून फक्त एक चार ते पाचच दिवस खाऊ शकता.

पनीर

पनीरच्या पाकिटावर एक्सपायरी डेट नसते. पनीरला बुरशी येऊ शकते. बुरशी आलेला भाग कापून टाकावा . त्याव्यतिरिक्त भागातील पनीर वापरता येऊ शकते. शिवाय पनीरची चव आणि वास यावरूनही ते ताजे आहे का हे कळू शकते.

चिकन आणि मासे

चिकन आणि मासे डीप फ्रीजरमध्ये तीन ते चार महिने टिकू शकते. डबाबंद मांसाहारी पदार्थ कालबाह्य तारखेपासून दो ते पाच वर्षांपर्यंत खाणे सुरक्षित ठरू शकते तसेच डिप फ्रीजरमध्ये ठेवलेल्या अन्नपदार्थांमध्ये विष निर्माण करणाऱ्या जिवाणुंची निर्मिती होत नाही.