
भरधाव वाहन चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी 9.15 सुमारास येरवडा मध्यवर्ती कारागृहाजवळील रस्त्यावर घडला. सुभाष शिवलिंग धुंडगिरी (वय 22, रा. गांधीनगर, येरवडा) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवलिंग धुंडगिरी (वय 50) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष सकाळी 9वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी येरवडा मध्यवर्ती कारागृहाजवळील रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या सुभाषचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कवितके तपास करीत आहेत.





























































