ओबीसी आरक्षणाचा वाद; ओबीसी विद्यार्थी युवा शाखेकडून अन्नत्याग आंदोलन सुरू

राज्यातील मराठा – ओबीसी आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून युवा शाखेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. रविंद टोंगे हे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहे. चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 वाजेपासून टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तावडे सर, महासचिव सचिन राजूरकर, चंद्रकांत खनके, राजेश बेले, दिनेश चोखारे सह शेकडो पद्धधिकारी उपस्थित होते.

17 सप्टेंबर रोजी ओबीसी महासंघ- ओबीसी संघटना आणि संवर्गातील विविध संघटनेद्वारे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नका, अशी मागणी करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ओबीसी समाज उपेक्षित असताना आता मराठा समाजाला ओबीसी संवर्गात सामील केल्याने गुंतागुंत वाढणार आहे, असे आमचे म्हणणे आहे.

मराठा समाजाच्या ओबीसी ( विजा , भज व विमाप्र) प्रवर्गात समाविष्ट करू नये. कुणबी प्रमापत्र देऊ नये. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकाने जातनिहाय सर्वे लवकरात लवकर सुरू करण्यात यावा आणि ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वसतिगृह जिल्हावार सुरू करण्यात यावे व स्वाधार योजना लागू करण्यात यावी, या प्रमुख मागण्या असल्याचे सांगण्यात आले.