शिवसेना उपनेत्यांची नावे जाहीर

सामना प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी सभा २०१८ ही २३ जानेवारी रोजी झाली. उपनेते पदांसाठी एकूण २१ जागा होत्या. त्या निवडणुकीद्वारे निवडल्या गेल्याने २१ उपनेत्यांची नावे जाहीर झाली. याशिवाय १० उपनेते हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यापूर्वीच नियुक्त केले होते. ते सर्व उपनेते त्या पदावर कार्यरत आहेत. परंतु ते निवडणुकीद्वारे निवडून आले नसल्याने त्यांची नावे जाहीर झाली नव्हती. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे सर्व उपनेत्यांची नावे आज पुढीलप्रमाणे जाहीर केली गेली.

शिवसेना उपनेते (निवडणुकीद्वारे)

अरविंद सावंत, रवींद्र मिर्लेकर, अनंत तरे, विश्वनाथ नेरूरकर, सूर्यकांत महाडिक, विनोद घोसाळकर, गुलाबराव पाटील, बबनराव घोलप, अनिल राठोड, अशोक शिंदे, यशवंत जाधव, डॉ. नीलम गोऱहे, विशाखा राऊत, मीना कांबळी, विजय कदम, डॉ. अमोल कोल्हे, सुहास सामंत, नितीन बानुगडे पाटील.

शिवसेना उपनेते (नियुक्तीद्वारे)

सुबोध आचार्य, दशरथ पाटील, विजय नाहटा, शशिकांत सुतार, शरद पोंक्षे, हाजी अराफत शेख, लक्ष्मण वडले, राजकुमार बाफना, अल्ताफ शेख, तानाजी सावंत, विठ्ठलराव गायकवाड, डॉ. रघुनाथ कुचिक.