11 विवाहित महिला प्रियकरासोबत पळाल्या

गरीबांना हक्काचे घर मिळावे, म्हणून केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) सुरू करण्यात आली. मात्र या योजनेचा गैरफायदा घेताना काही लोक दिसत आहेत. पीएम आवास योजनेचे पैसे मिळताच 11 विवाहित महिला नवऱयाला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या सर्व महिला उत्तर प्रदेशातील मूळच्या महाराजगंज जिल्ह्यातील आहेत. या महिलांनी पीएम आवास योजनेंतर्गत 40,000 रुपयांचा पहिला हप्ता बँक अकाऊंटमध्ये जमा होताच पतीला सोडून प्रियकरांसोबत पळ काढला. या महिलांच्या पतींनी या घटनेबाबत एफआयआर दाखल केला. उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील सुमारे 2,350 लाभार्थ्यांना अलीकडे पीएम आवास योजनेचा पहिला हफ्ता मिळाला. पीएम आवास योजनेअंतर्गत थुठीबारी, शीतलापूर, चटिया, रामनगर, बकुल दिहा, खसरा, किशूनपूर आणि मेधौली गावातील हे लाभार्थी आहेत. लाभार्थ्यांपैकी 11 महिला या योजनेचा पहिला हफ्ता घेऊन फरार झाल्या.