अमरावतीत आढळले कोरोनाचे 116 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 11 हजारांच्या वर

अमरावती जिल्हात आज कोरोनाचे 116 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 11 हजार 744 वर पोहोचली आहे. दरम्यान कोरोनामुळे आतापर्यंत 247 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दुपारपर्यंत आलेल्या अहवालानुसार 166 रुग्ण आढळून आले असून अमरावती जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण अचलपूर तालुक्यात 13 आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ मोर्शी व वरुड येथे सुद्धा कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे वरुड येथे चार दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त धामणगाव रेल्वे, दर्यापूर, चांदूर रेल्वे येथे सुद्धा रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात 1463 रुग्ण उपचार घेत असून उर्वरित 13 रुग्ण नागपूर येथे भरती आहेत. सध्या गृह विलगीकरणात 1167 रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या