अरेच्चा! 131 किलो केकपासून बनवला ड्रेस!!

स्वित्झर्लंडमधील नताशा कॉलिन या बेकरने तब्बल 131 किलो केकपासून ड्रेस तयार केला आहे. एका फॅशन शोच्या समारोपानंतर या केकचे प्रदर्शन करण्यात आले होते. केकपासून बनवलेला ड्रेस परिधान केलेल्या महिलेचा एक व्हिडीओदेखील इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लेयर्ड केक ड्रेसला लग्नाचा पोशाखाच्या पारंपरिक पैलूंसह, रॉयल आइसिंगने स्वीटहार्ट नेकलाइन आणि फुलांनी सजवले होते. नताशा ही 2014 पासून स्वीटकेक्स नावाची बेकरी चालवते. जी कस्टम केकची निर्मिती करते. याच बेकरीत तिने भलामोठा केकचा ड्रेस बनवला असून या अनोख्या ड्रेसची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.