गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली 14 वाहनांची जाळपोळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-symbolic

सामना ऑनलाईन । गडचिरोली

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ करून दहशत निर्माण करण्याता प्रयत्न केला आहे. एटापली तालुक्यात सुरू असलेल्या हालेवारा-गटेपल्ली मार्गाच्या कामासाठी असलेले 10 जेसीबी, 3 ट्रॅक्टर आणि 1 पिकअप वाहनाची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली आहे. जाळपोळीमुळे नागरिक आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत हालेवारा-गटेपल्ली मार्गाचे काम सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कामाच्या ठिकाणी असलेली सर्व वाहने नक्षलवाद्यांनी एकत्र करून कामगारांसमोरच या वाहनांना आग लावली. जाळपोळ झालेला परिसर अत्यंत दुर्गम असल्याने अद्याप पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. दरम्यान, एटापली तालुक्यात पोलिसांनी 40 नक्षल्यांचा खात्मा केल्यानतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.