
देवगड-आचरा सागरी मार्गावर भरधाव वेगाने डंपर चालविणाऱ्या डंपरचालकाला देवगड पोलिसांनी पकडले. मोटर वाहन कायद्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. देवगड न्यायालयाने 2 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 10 दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सागरी मार्गावर वाळुचा डंपर भरधाव देवगडकडे नेणाऱ्या डंपरचालकाला पोलिसांनी पकडले.
डंपरचालक आदित्य प्रमोद कावले (21, रा.चदर,देवुळवाडी, ता.मालवण) हा बुधवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास वाळूचा डंपर भरधाव वेगाने देवगडच्या दिशेने नेत होता. मसवी येथे देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव, निलेश पाटील यांनी त्याच्याविरूध्द रस्त्याचा विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने व अविचाराने भरधाव वेगाने वाहन चालविल्याप्रकरणी कारवाई केली. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून देवगड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. देवगड न्यायालयाने याप्रकरणी डंपरचालक आदित्य प्रमोद कावले याला 2 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 10 दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
































































