Lok Sabha 2019 जम्मू-कश्मीर वगळता 4 राज्यांत लोकसभेसोबत विधानसभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी जाहीर केला, मात्र जम्मू-कश्मीर विधानसभेसाठी निवडणूक सध्या होणार नाही. येथे केवळ लोकसभेची निवडणूक होईल. जम्मू-कश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे.

आंध्र प्रदेश

  • विधानसभेच्या जागा – 175
  • मतदान – 11 एप्रिल
  • सध्या तेलगू देसमची सत्ता

अरुणाचल प्रदेश

  • विधानसभेच्या जागा – 60
  • मतदान – 11 एप्रिल
  • सध्या भाजपचे सरकार

ओडिशा

  • विधानसभेच्या जागा – 147
  • मतदान – 11, 18, 23 आणि 29 एप्रिल
  • सध्या बिजू जनता दलाची सत्ता

सिक्कीम

  • विधानसभेच्या जागा – 32
  • मतदान – 11 एप्रिल
  • सध्या सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे सरकार