तैवानला रात्रभर भूकंपाचे धक्के; तीव्रता 6.3 रिश्टर स्केल, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

तैवानच्या भूकंपग्रस्त पूर्वेकडील हुआलियन Hualien ला सोमवारी उशिरा आणि मंगळवारी पहाटे डझनभर धक्के बसले, परंतु या भूकंपाच्या धक्क्यांनी काही प्रमाणात नुकसान झाले आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे.

हा भाग ग्रामीण आणि विरळ लोकवस्ती असल्याचं सांगण्यात येत आहे. Hualien ला 3 एप्रिल रोजी 7.2 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला होता ज्यात किमान 14 लोकांचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून 1,000 हून अधिक लहान लहान भूकंपाचे धक्के बसत आहेत.

राजधानी तैपेईसह उत्तर, पूर्व आणि पश्चिम तैवानच्या मोठ्या भागांतील इमारती रात्रभरात बऱ्याचदा हादरल्या. यापैकी सर्वात मोठा भूकंप 6.3 रिश्टर स्केलचा होता.

तैवानच्या सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशननेही यासंदर्भात माहिती दिली आहे. सिस्मॉलॉजिकल सेंटरचे संचालक वू चिएन-फू यांनी पत्रकारांना सांगितलं की काही वेळेच्या अंतरानं भूकंपाचे धक्के जाणवत होते आणि ते अधिक तीव्रतेचे नसले तरी आणखी काही धक्के बसण्याची शक्यता आहे.

या आठवड्यात संपूर्ण तैवानमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आल्याने, हुआलियनमधील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

हुआलियन अग्निशमन विभागाने सांगितले की, 3 एप्रिल रोजी नुकसान झाल्यानंतर आधीच निर्जन असलेल्या दोन इमारतींना आणखी नुकसान झाले आणि त्या झुकल्या आहेत. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.