पाकिस्तान, शमशान, कब्रस्तान, हिंदू-मुसलमान पंतप्रधानांचे आवडते शब्द; लालूप्रसाद यादव यांनी मोदींची घेतली हिंदीची शिकवणी

lalu prasad yadav

पाकिस्तान, शमशान, कब्रस्तान, हिंदू-मुसलमान, मंदिर-मस्जिद, मछली-मुगल, मंगलसूत्र आणि गाय तसेच म्हैस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवडते शब्द आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील हे शब्द असून सातव्या टप्प्यापर्यंत या शब्दकोशात आणखी चार नावांची भर पडू शकते, अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे सर्वोसर्वा लालूप्रसाद यादव यांनी मोदींची हिंदीची शिकवणी घेतली. ‘एक्स’वरून त्यांनी मोदींवर सडकून टीका केली.

हिंदी भाषेत जवळपास दीड लाख शब्द असल्याचे सांगितले जाते, परंतु काही तांत्रिक शब्दांना मोजले तर ही शब्दसंख्या साडेपाच लाखांवर जाऊ शकते, असे यादव यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नौकरी-रोजगार, गरिबी-किसानी, महंगाई-बेरोजगारी, विकास-निवेश, छात्र-विज्ञान-नौजवान हे शब्द विसरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, मोदी व भाजपला संविधान नष्ट करायचे आहे. संविधान संपवून दलित आणि वंचितांना गुलाम बनवायचे असल्याची टीकाही त्यांनी केली.