नकली शिवसेना म्हणणारे बेअकली! हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नांवर बोला! उद्धव ठाकरे यांचा अमित शहांवर पलटवार…

शिवसेनेला नकली म्हणणाऱया बेअकली जनता पक्षाचे सरदार अमित शहा रत्नागिरीत येऊन आव्हान देऊन गेले. हिंमत असेल तर याच्यावर बोला, त्याच्यावर बोला. अरे, तुमच्यात हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नांवर बोला. दहा वर्षे नुसतीच अंडी उबवत बसलाय. कोंबडीचोराला सोबत घेतले तरी अंडय़ातून पिल्लू का बाहेर आले नाही, त्याच्याकर बोला, असे प्रतिआव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिले. तुमच्यापेक्षा खरंच कोंबडं बरं. अंडे उबवले तर पिल्लू तरी येतेय. तुम्ही दहा व र्षे खुर्च्या उबवताय तरी त्यातून काही बाहेर पडत नाही. ढेकणं झाली असतील खुर्चीमध्ये. तरीही लाज नाही, अशी खिल्लीही उद्धव ठाकरे यांनी उडवली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कणकवली येथे आज जाहीर सभा झाली. त्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहांनी राम मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर, काँग्रेसचा जाहीरनामा यावरून दिलेल्या आव्हानांचा समाचार घेतला.

अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होत असताना आपण तमाम शिवसैनिकांना घेऊन नाशिवच्या काळाराम मंदिरात गेलो होतो याची आठवण यावेळी उद्धव ठाकरे यांनी शहांना करून दिली. त्या काळाराम मंदिराचा इतिहास माहीत आहे का शहांना? राम माझाही आहे, मलाही मंदिरात जाण्याचा हक्क आहे, असे सांगत आंदोलन करून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्या मंदिरात गेले होते. त्यावेळी भाजपवाल्यांसारखे बुरसटलेले गोमूत्रधारी त्यांना विरोध करत होते, असा सणसणीत टोला लगावतानाच, शिवसेनेचे हिंदुत्व सुधारणावादी आहे, गोमूत्रधारी नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. काळाराम मंदिराचे महत्त्व अमित शहांना माहीत नसेल, मी तिथे जाणार म्हटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते तिथे झाडलोट करायला, त्याचे फोटोही आले होते, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, रमेश गोवेकर, अंकुश राणे प्रकरणांची उदाहरणे यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिली. या हत्यांचा शोध लावा ना, हे लोक कुठे गायब झाले. ती कृत्ये करणारा भाजपमध्ये जाऊन स्वच्छ झाला असेल पण त्याने केलेली पापे जनतेच्या मनात अजूनही कायम आहेत, याची जाणीव यावेळी उद्धव ठाकरे यांनी करून दिली. नारायण राणेंना मत म्हणजे मोदींना मत, म्हणजे या गुंडगिरीला मत असे भाजपला म्हणायचेय का, असा सवालही त्यांनी केला.

यावेळी शिवसेना नेते ऍड. अनिल परब, आमदार वैभव नाईक, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, अरविंद भोसले, संजय पडते, संदेश पारकर, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सतीश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाप्रमुख अमित सामंत, आपचे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकरउपस्थित होते.

बाळासाहेब, बाळासाहेब काय? हिंदुहृदयसम्राट बोला

बाळासाहेबांबद्दल बोलताना भान ठेवा अशी तंबी मोदी-शहांना देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेब बाळासाहेब काय? ते काय तुमच्या वर्गात होते? हिंदुहृदयसम्राट बोला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला. हिंदुहृदयसम्राट बोलायला जीभ अडखळत असेल तर ती सरळ कशी करायची हे कोकणातीलच नव्हे संबंध देशातील जनता जाणते, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

शुभ बोल नाऱया… आडवा आलास तर गाडूनच टाकतो

उद्धव ठाकरे यांनी यावेळी नारायण राणे यांच्या धमकीला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली. (यावेळी उपस्थितांमधून कोंबडीचोर… असा जोरदार आवाज आला) मराठीत एक म्हण आहे. शुभ बोल रे नाऱया. मी येणार म्हटल्यानंतर कसे येतात बघतो म्हणाला. अरे, हा बघ मी येऊन उभा आहे. तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो. अरे तुला लाज वाटली पाहिजे. दोन-तीन वेळेला कोकणात येऊन तुला आडवा केला. माझ्या घराजवळ उभा राहिलास तिकडे साफ करून टाकला. तरीही लाज नाही लज्जा नाही. फक्त बडबडतो. म्हणूनच म्हटले, शुभ बोल रे नाऱया,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

राणेंना मत म्हणजे मोदींना नव्हे, गुंडगिरीला मत

उद्धव ठाकरे यांनी यावेळी नारायण राणे यांचा पार कचराच करून टाकला. मतदारसंघात राणे यांच्या जाहिरातींवरून त्यांनी निशाणा साधला. कचरा उचलायची गाडी येते ना गावात, त्या गाडीत सर्वजण कचरा टाकतात, तसे कचऱयाचे प्रदर्शन आता पाहतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्याला बाळासाहेबांनी गेटआऊट म्हणून सांगितले तो पुन्हा धमक्या देतोय. अरे कोणाला धमक्या देतोस, या धमक्यांना कोकणवासियांनी कधीच गाडून टाकलेय, 2005 ची पोटनिवडणूक आठवा, असे उद्धव ठाकरे राणे यांना उद्देशून म्हणाले.

सावरकरांवर बोलायला सांगता, मग श्यामाप्रसाद मुखर्जींवरही बोला

मला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलायला सांगताय, मग अमित शहाजी, तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवर बोला, असे आव्हानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिले. जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी हे राजकारणातले बाप होते. 1940 ला ज्या मुस्लिम लीगने हिंदुस्थानची फाळणी मागितली होती तिच्याशी मुखर्जी यांनी युती केली होती. फजलूर हक यांच्या मांडीला मांडी लावून भाजपचे ते राजकीय बाप सत्तेत बसले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मोदींना घरी बोलवले तर घरातलेही काहीतरी पळवून नेतील

काजूला हमीभाव नाही पण गद्दारांना आहे. पंतप्रधान मोदी कोकणात आले तेक्हा मोठी घोषणा करतील असे काटले होते. पण केलीच नाही. उलट सिंधुदुर्गात येऊ घातलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला घेऊन गेले. मोदींना घरीही कुणी बोलवणार नाही. कारण त्यांना घरात बोलवले तर काय चांगले आहे ते बघतील आणि तेसुध्दा गुजरातला पळवून नेतील, अशी खिल्ली याव्ळी उद्धव ठाकरे यांनी उडवली.

शहाजी, परत या आणि सांगा, कोकणात बारसू रिफायनरी होऊ देणार नाही

शिवसेना बारसू रिफायनरी होऊ देणार नाही, पण अमित शहा यांनी हिंमत असेल तर उद्या पुन्हा कोकणात यावे आणि सांगावे की बारसूची रिफायनरी होऊ देणार नाही, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले. जैतापूर, नाणार आणि पुन्हा बारसू कोकणच्या माथ्यावर मारायचे. कोकणचा निसर्ग मारून टाकायचा. आता तर जांभा दगडाकरही परप्रांतियांचा डोळा आहे. जैतापूरमध्ये सातबाऱ्यावर शहा-मोदी या परप्रांतियांची नावे चढली कशी, असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

राममंदिर उद्घाटनाला भ्रष्टाचाऱयांना घेऊन बसलात

अमित शहा राम मंदिरावर बोला म्हणतात. हो बोलतोय मी. राम मंदिरासाठी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. राम मंदिर बांधले हे चांगलेच केले, पण भाजपची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने राममंदिरासाठी पुढाकार घेतला होता, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. 22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनावेळी शंकराचार्यांना न घेता तुम्ही भ्रष्टाचाऱयांना घेऊन बसला होतात, असा हल्लाही उद्धव ठाकरे यांनी चढवला.

7 तारखेला बटण दाबून 20 तारखेला मुंबईत या

मुंबईकर चाकरमानी कोकणात गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांनाही यावेळी आवाहन केले. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरतोय. कोकण तर शिवसेनेच्या हक्काचे आहे. शिवसेनेचे कोकणशी नाते मोदी-शहांसारखे नाही. आपला बहुत पुराना रिश्ता है, असे सांगतानाच, येत्या 7 मे रोजी कोकणात मतदान झाल्यानंतर 20 मे रोजी मुंबईत या.

फटकारे

कोरानाची खिचडी खाल्ली म्हणता, मग उत्तर प्रदेशमध्ये काय केले. गंगेत प्रेते वाहिली तिकडे पण महाराष्ट्रात आम्ही एकाही प्रेताची तशी अवस्था होऊ दिली नाही. अमित शहांना बोलवतोय. बाजूबाजूला बसूया. जनतेसमोर सांगूया तुम्ही सत्तेवर आल्यानंतर डिझेल पेट्रोल गॅसची किंमत काय होती. 2 कोटी जणांना नोकऱ्या देणार होतात त्याचे काय झाले.

– शिवसेनेला नकली म्हणणाऱया बेअकली जनता पक्षाचे नेते अमित शहा आज रत्नागिरीत पचकून गेले. जे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली नाहीतर काय. आजपर्यंत भाजपाला मी भेकड जनता पक्ष म्हणत होतो तरी लाज नाही. भाकड म्हणतो तरी लाज काटायला तयार नाही. कमळाबाई म्हणतो तरीही काय फरक नाही. म्हणून आज नकीन नाक दिले. आता ब ची बाराखडी किती म्हणायची. मला बाराखडय़ा येतात पण शांत, संयमी असा शिव्का बसल्याने मी बोलू शकत नाही.

– दहा वर्षे नुसतीच अंडी उबवताय, कोंबडीचोराला सोबत घेतले तरी अंडय़ातून पिल्लू का बाहेर आले नाही?

– मुख्यमंत्री होण्याआधी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरही मी अयोध्येला गेलो. तुम्ही काढाल तो मुहूर्त हे आम्हाला पटत नाही. श्रीराम आम्हाला बोलकतील तेक्हा जाऊच. पण तुम्ही अजून भकानीमातेच्या मंदिरात का नाही गेलात? असा सकाल उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना करताच ‘जय भकानी जय शिवाजी’ हा नारा घुमला. त्याकर भाजपकाल्यांची कढी पातळ क्हायला हकी इतक्या जोरात घोषणा द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.