5 वर्षात लष्कराच्या 642 जवानांची आत्महत्या; केंद्राची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच वर्षात लष्करातील 642 जवानांनी आत्महत्या केल्याची माहिती मंगळवारी संसदेत संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. संसदेत संरक्षण मंत्रालयाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

हवाई दलातील 148 तर नौदलातील 29 जवानांनी आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली. जवानांमधील आत्महत्या रोखण्यासाठी आणि याबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येत असल्याची माहितीही संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.