
एस.एम.पाटील । परळी वैजनाथ
जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या अनियमितता व अपहार प्रकरणी पुढील चौकशीसाठी तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यात २०१४ ते २०१७ दरम्यान झालेल्या जलयुक्त शिवार योजना अंतर्गत मृदसंधारण कामाची बोगस बिले उचलून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून १३८ संस्था कंत्राटराच्या परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.तसेच या प्रकरणी २४ कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर ही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
परळी विधानसभा मतदार संघात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ८८३ कामे २०१४ ते – २०१७ दरम्यान मंजुर झाले. त्यापैकी ३०४ कामे केलीच नाहीत सात कोटी, ९२ लाख रूपयाची बोगस बिले विविध संस्थेच्या नावाने अधिकारी, कंत्राटदारांनी व सत्ताधारी, विरोधक पदाधिकाऱ्यांनी उचलली अशी तक्रार वसंत मुंडे यांनी मुख्यमंत्री,कृषी आयुक्त पुणे यांच्याकडे त्यावेळी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन ३०७ कामांची पाहणी कृषी पाहणीच्या केली होती. बांधबंदीस्त, बंधारे, चारया, कंपर्ट बर्ल्डींग ही मृद संधारणीची कामे मंजुर होऊनही केली नाहीत, असे निदर्शनस आल्याने मार्च २०१८ मध्ये परळी व अंबाजोगाई कृषी कार्यालयातील २४ अधिकारी कर्मचाऱ्यांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आपल्या पाठपुराव्याला यश आले असल्याचे वसंत मुंडे यांनी सांगितले. परळी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास अर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या बाबत या गुन्ह्य़ातील आवश्यक दस्तावेज तपासकामी अर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आले असल्याची माहिती परळी शहर पोलीस निरीक्षक देविदास शेळके यांनी दिली आहे.
































































