
सामना ऑनलाईन । मुंबई/नवी दिल्ली
पुढील चार महिन्यांत मार्च 2019 पर्यंत देशभरातील 50 टक्के ‘एटीएम’ बंद पडण्याची भीती ‘कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री’ने (सीएटीएमआय) व्यक्त केली आहे. त्यामुळे नोटाबंदीनंतर झालेल्या एटीएममध्ये खडखडाट आणि लोकांच्या लांबच लांब रांगा हे चित्र पुन्हा देशात दिसण्याची शक्यता आहे. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातील जनतेला मोठा फटका बसणार आहे.
देशात सध्या 2 लाख 38 हजार एटीएम मशीन्स आहेत. त्यापैकी तब्बल 1 लाख 13 हजार एटीएम मार्च 2019 पर्यंत बंद पडू शकतील. यातील एक लाख एटीएम बँक खात्याशी संलग्न नसणारे म्हणजे ऑफ साइट एटीएम आहेत तर 15 हजार व्हाइट लेबल एटीएम असल्याचे ‘सीएटीएमआय’ने म्हटले आहे.
कशामुळे बंद होणार
– देशभरातील एटीएम ऑपरेटर्ससाठी नवीन नियम लागू करण्यात आले असून या नियमांना एटीएम मशीन्स ऑपरेटर्सची संस्था असणाऱया ‘सीएटीएमआय’ने विरोध केला आहे.
– सर्व एटीएम मशीन्सचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपडेट करण्यास ‘सीएटीएमआय’ला सांगण्यात आले आहे. याचा खर्च एटीएम ऑपरेटर कंपनीला करावा लागेल.
– सर्व एटीएममधील रोख रक्कम कॅस्टेल स्वॅप प्रकाराने भरण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. या नवीन एटीएममुळे या क्षेत्रात नोकऱयांवर गदा येण्याची शक्यता आहे.




























































